चराठा ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु

भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनाच्या माध्यमातून जोरदार प्रचार; महेश पांचाळ यांच्याकडे जबाबदारी

⚡सावंतवाडी ता.१२-: चराठा ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनाच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे.

दरम्यान चराठा ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी माजी जि. प अध्यक्षा सौ. रेशमा सावंत व भाजपचे पदाधिकारी तथा शिवधर्म प्रतिष्ठान मंडळाचे सदस्य महेश पांचाळ यांच्याकडे असून त्यांनी सदस्य पदाचे उमेदवार अमित परब यांच्यासह भाजपच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे.

You cannot copy content of this page