माजगावात “काटे की टक्कर”

सावंत विरुद्ध सावंत उमेदवाराने सरपंच पदासाठी चुरस

⚡सावंतवाडी ता.१२ प्रसन्न गोंदावळे-: तालुक्यातील प्रतिष्ठेची ठरत असलेल्या माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप – शिंदे गट या दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत. दोन्ही कडील सरपंच पदाचे उमेदवार हे सावंत असल्याने माजगावात ही निवडणूक चुरशीशी बनली आहे. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार केला जात असून माजगावात सरपंच कोणाचा बसणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलाय.

दुसरीकडे विक्रांत सावंत नेमकी कशाप्रकारे रणनीती आखणार याकडे महा विकास आघाडीकडून लक्ष लागले आहे. तसचे भाजपने देखील येथे दोन निरीक्षकांची नेमणूक गेली आहे. त्यामुळे भाजपने देखील जोरदार रणनीती आखली आहे. त्यामुळे विजय कोणाचा होणार ? हे चित्र २० डिसेंबर रोजी स्पष्ट होणार असेल तरी यानिमित्त माजगाव सध्या तरी “काटे की टक्कर” पाहायला मिळत आहे.

You cannot copy content of this page