Headlines

आनंदयात्रीच्या वक्तृत्व स्पर्धेत कृपा म्हाडदळकर व निर्जरा पाटील प्रथम

⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळातर्फे ८ डिसेंबर रोजी घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कृपा म्हाडदळकर तर खुल्या गटातून निर्जरा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

  येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटासाठी ‘माझा आवडता लेखक‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात  प्रथम-कृपा उत्तम म्हाडदळकर (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा), द्वितीय-श्रावणी राजन आरांवदेकर (कुडाळ हायस्कूल), तृतीय-वरद संदेश प्रभू (लक्ष्मीनारायण विद्यालय, बिबवणे), उत्तेजनार्थ-श्रृती श्रीधर शेवडे (न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा) व साध्वी अनंत मिडे (पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला) तसेच खुल्या गटासाठी ‘वाचन संस्कृतीची गरज‘ हा विषय ठेवण्यात आला होता. यात प्रथम-निर्जरा संजय पाटील (वेंगुर्ला), द्वितीय-विभूती विजय ठाकूर (कुडाळ), तृतीय-प्रसाद विश्वनाथ खडपकर (नवाबाग), उत्तेजनार्थ-फाल्गुनी अजित नार्वेकर व लक्ष्मी प्रकाश प्रभूखानोलकर (बॅ.खर्डेकर कॉलेज,वेंगुर्ला) यांनी क्रमांक पटकाविला. खुल्या गटाचे परिक्षण अजित राऊळ व वैभव खानोलकर यांनी तर शालेय गटाचे परिक्षण प्रा.पी.आर.गावडे व वेदिका सावंत यांनी केले.

  स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी वृंदा कांबळी, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.डी.बी.राणे, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रा.सचिन परुळकर यांनी सूत्रसंचालन केले. तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजय पाटील व प्रा.सचिन परुळकर यांनी प्रयत्न केले.

फोटोओळी – वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page