⚡मालवण ता.११-: कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापूर येथे झाले. या अधिवेशनात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते डी.एड. कॉलेज मालवणचे प्राध्यापक व उपक्रमशील शिक्षक प्रा. नागेश कदम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. नागेश कदम यांनी गेल्या १५ वर्षात विविध राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत क्रमांक प्राप्त केले आहेत. या कार्यक्रमास कास्ट्राईबचे सरचिटणीस आकाश तांबे, कार्याध्यक्ष रवींद्र पालवे, कृष्णा इंगळे, कोल्हापूरचे अध्यक्ष गौतम वर्धन, कार्याध्यक्ष तुकाराम संघवी, कोषाध्यक्ष पी. डी. सरदेसाई, सरचिटणीस संजय कुर्डुकर आदी उपस्थित होते.
