⚡बांदा ता.११-: ग्रामपंचायत निवडणुकीत रोणापाल गाव विकास पॅनलने आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी माजी सरपंच तथा प्रचार प्रमुख प्रकाश गावडे, ग्रामस्थ दादा गावडे यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार सोनाली सुदिन गावडे तसेच सदस्य पदाचे उमेदवार शेरेपिन अंतोन मारणेकर, नंदकिशोर राजाराम नेमण, राजन सदाशिव परब, मंगेश गणेश गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रचार प्रमुख प्रकाश गावडे म्हणाले की, यावेळी बदल निश्चित होणार. सरपंच निवड थेट जनतेतून होत असल्यामुळे रोणापाल गाव विकास पॅनलला बहुमत मिळून पूर्णच्या पूर्ण पॅनल विजयी होईल असा विश्वास श्री गावडे यांनी व्यक्त केला.
