वायंगणी येथील गृप डान्स स्पर्धेत ऐंजल पुणे तर सोलो डान्स मध्ये इसिता बारवाड पुणे प्रथम

⚡मालवण ता.११-:
वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त आयोजित राज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धेत ऐंजल पुणे तर सोलो डान्स मध्ये इसिता बारवाड पुणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त राज्यस्तरीय गृप डान्स स्पर्धा घेण्यात आली त्याचा निकाल पुढीलप्रमाणे
गृपडान्स मध्ये द्वितीय क्रमांक जय हनुमान उरण, तृतीय नागबादेवी वसई,तर चतुर्थ यंगस्टार मालवण यांना गौरविण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या सोलो डान्स स्पर्धेत प्रिया नसकर मुंबई, समर्थ गवंडी रेडी,तर उत्तेजनार्थ सोहम झांबोरे सावंतवाडी यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई येथील स्वामी भक्त चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष सदानंद राणे, वायंगणी सरपंच संजना रेडकर, संतोष सावंत, वायंगणी हायस्कूल चे मुख्याध्यापक टकले सर, कल्याण साळकर, सागर राणे स्वामी समर्थ सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page