समर्थ विकास पॅनलच्या
प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कणकवली 11 डिसेंबर (प्रतिनिधी)-
नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून भाजपा पुरस्कृत
समर्थ विकास पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणेंच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, सरपंच पदाचे उमेदवार भाई मोरजकर, नांदगाव पं. स. सदस्या सौ हर्षदा वाळके, सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, तोंडवली सरपंच मनाली गुरव, माजी सरपंच संजय पाटील, आनंद मोरजकर, नितेश म्हसकर, कमलेश पाटील,राजू तांबे, राजू खोत, आनंद गगनग्रास ,यासिर मास्के, असलदे सरपंच उमेदवार रघुनाथ लोके, दयानंद हडकर, संतोष मिराशी, संतोष घाडी,प्रकाश परब, इरफान साठविलकर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणेंनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करुन गावच्या सर्वांगीण विकासासाठी या पॅनलच्या सरपंच सहीत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यावी. असे आवाहन केले आहे.प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर, स्वागत पंढरी वायंगणकर तर आभार भाई मोरजकर यांनी मानले आहे.

You cannot copy content of this page