२७ नोव्हेंबर रोजी मळगाव येथे झालेल्या अपघात प्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा

तिघांच्या अपघातात कारणीभूत ठरल्याचे कारण

सावंतवाडी मळगाव येथे दुचाकी वरून जाणाऱ्या “त्या” तिघा युवकांच्या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात २७ नोव्हेंबरला रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला होता. या अपघातात लवू रामचंद्र राऊळ, ओंकार बाळा राऊळ व अक्षय अशोक भगत (तिघेही रा. मळगाव) हे जखमी झाले होते. दरम्यान लवू याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त तिघेही युवक आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जत्रेला जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका बोलेरोने त्यांना जोरदार धडक दिली होती. यात दोघांना गंभीर तर एकाला किरकोळ दुखापत झाली होती. दरम्यान या प्रकरणी त्यातील जखमी लवू याने सावंतवाडी पोलिसात बोलेरो चालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार हायगयीने वाहन चालवत तिघांच्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page