माजगावातील इन्व्हर्टर-बॅटरी चोरी प्रकरणी संशयितास दोन दिवसाची पोलीस कोठडी

सावंतवाडी
माजगाव सोनबहावा या प्रकल्पाच्या बंगल्यातील इन्व्हर्टर व बॅटरी चोरी केल्याची कबुली संशयित आरोपी दत्ताराम कालेलकर यांनी दिली असून त्याने ओटवणे येथील जंगलातून लपवून ठेवलेले दोन्ही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान कालेलकर याला न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


दोन दिवसापूर्वी माजगाव सोनबहावा येथील प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या बंगला फोडून संशयित कालेलकर यांनी आतील इन्व्हर्टर व बॅटरी चोरी केली होती या प्रकरणी तेथील केअरटेकर विश्वनाथ गोसावी राहणार कुंभार्ली मळगाव यांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीची तक्रार दिली होती दरम्यान पोलीस तपासात पोलिसांनी दत्तराम कालेलकर राहणार कोलगाव याला संशयित म्हणून ताब्यात घेतले होते आज अधिक तपासात त्याने चोरीची कबुली दिली चोरीचा मुद्देमाल ओटवणे जंगलात लपवून ठेवल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी उशिरा घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला तर कालेलकर याला अटक करून येथील न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास पोलीस हवालदार श्री राऊत करत आहेत.

You cannot copy content of this page