कुंब्रल येथील पिता-पुत्रांना दोन दिवसाची पोलिस कोठडी
सावंतवाडी
बनावट कागदपत्रे आणि शिक्के करून केसरी येथील शंभरहून अधिक एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल असलेल्या कुंब्रल ता. दोडामार्ग येथील पिता-पुत्रांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली त्याना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळून त्याची न्यायालयात रवानगी करण्यात आली. याबाबतची माहीती पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
