Headlines

आरोस येथील श्री गिरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव २ डिसेंबर रोजी

*⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* आरोस येथील जागृत देवस्थान श्री देव गिरोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २ डिसेंबर रोजी साजरा होत आहे.

हाकेला धावणारा, नवसाला पावणारा म्हणून या देवतेची सर्वदूर ख्याती आहे. भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं या देवतेला नवस बोलतात, नवस फेडतात, या देवतेच्या चरणी लीन होतात. जत्रोत्सव दिवशी सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, ओटी भरणे, गाऱ्हाणे घालणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच श्री देवी माऊली मंदिराकडून तरंगकाठी वाजत गाजत श्री गिरोबा मंदिरात आणल्यावर रात्री मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाणार आहे.रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविक भक्तांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page