⚡वैभववाडी ता.२९-: वैभववाडी केंद्रबल गटातील जिल्हा परिषद प्राथमिक व पूर्ण प्राथमिक शाळांच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेच्या प्रागंणात कबड्डी लहान गट शाळा श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नं 1 संघ विरुद्ध शाळा वाभव नं 1 संघ यांच्या सामन्याने पत्रकार संजय शेळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
जिल्हा परिषदेच्या वतीने प्रतीवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक सक्षमीकरणावर आधारित क्रीडाप्रकारांचा समावेश केला जातो.
वैभववाडी केंद्रस्तरीय क्रीडामहोत्सव सलग दोन दिवस संपन्न होणार असून यामध्ये नावळे बिरदेव, नावळे धनगरवाडा, नावळे नं 1, सांगुळवाडी नं 1, सांगुळवाडी टेंबवाडी, सांगुळवाडी फाटकवाडी, दत्त विद्यामंदिर वैभववाडी नं 1, वाभवे नं 1, एडगांव नं 1, एडगांव फौजदारवाडी, एडगांव तांबेवाडी, एडगांव तांबेवाडी, वायंबोशी या शाळांचे खेळाडू सहभागी झाले आहेत.
यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिंदे, प्रताप रावराणे, जयदिप तांबे, दिप्ती फाटक, सौ.रावराणे, साक्षी तांबे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका दिप्ती पाटील, रणजित पाताडे, लता तांबे, पंढरीनाथ सावंत, चेतन बोडेकर, चव्हाण सर,बागल सर.समिर सरवणकर,साठे मॅडम,सावंत मॅडम,पारधिवाड सर,परब सर,नाना तांबे, स्नेहलता राणे, केंद्रबल गटातील शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
वैभववाडी केंद्रबल गटातील क्रीडामहोत्सवाचे संजय शेळके यांच्या हस्ते उदघाटन
