न्हावेली येथील श्री देवी माऊली रवळनाथाचा २ रोजी जत्रोत्सव

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: न्हावेली येथील श्रीदेवी माऊली रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.

यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद नाईक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page