आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना ‘दी प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.२९-: मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर आणि सूर्यकांत फोंडेकर यांची दिल्ली येथे २०२३ सालच्या आयकॉनिक अवार्ड फंक्शन साठी निवड होऊन ‘दी प्राईड ऑफ इंडिया’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे.

कृषी संस्थेच्या अहवालानुसार उत्तम फोंडेकर यांनी तीन वर्षे राज्यात पहिली हापूस आंब्याची पेटी पाठविली होती. त्यात गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर रोजी घेतलेले प्रथम उत्पादन राज्य आणि देशासह जगातही प्रथम क्रमांकाचे होते. त्यानंतर जपानचा सर्वात महागडा मियाझाकी आंबा आणि आफ्रिकेचा मलावी आंबा अनुक्रमे ८ व १५ दिवसांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तसेच थेट विक्रीसाठी आला होता. फोंडेकर यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल फोंडेकर यांचे कृषी मंडळ अधिकारी दिनेश लंबे यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page