सरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी ९७ नामनिर्देशन पत्र दाखल

⚡ओरोस ता.२९-: जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशीसरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी ९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३९ तर सदस्यपदासाठी १०३ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली.
तालुका निहाय दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे: कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी १०, सदस्य पदासाठी २०,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १०,सदस्य पदासाठी २२. वैभववाडी – ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी १, सदस्य पदासाठी २,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १, सदस्य पदासाठी २. देवगड – ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी २०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६,सदस्य पदासाठी २१.
मालवण – ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी ३, सदस्य पदासाठी ७,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३, सदस्य पदासाठी ७. कुडाळ – ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी ११, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ५, सदस्य पदासाठी ११. सावंतवाडी- ग्रामपंचायत संख्या ५२, सरपंचपदासाठी निरंक, सदस्य पदासाठी १,आज अखेर सरपंचपदासाठी एकूण निरंक, सदस्य पदासाठी १. वेंगुर्ला- ग्रामपंचायत संख्या २३, सरपंच पदासाठी ४, सदस्य पदासाठी १८, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६, सदस्य पदासाठी २१. दोडामार्ग – ग्रामपंचायत संख्या २८, सरपंच पदासाठी ७, सदस्य पदासाठी १८, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ८, सदस्य पदासाठी १८.

You cannot copy content of this page