मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मालवणात होणार जल्लोषी स्वागत – विनोद सांडव

⚡मालवण ता.२९-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात ते १ व २ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यात असणार आहेत. त्यांच्या सोबत मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांचीही उपस्थिती असणार आहे. राज ठाकरे व अमित ठाकरे यांचे मालवण दौऱ्यात चौके, कुंभारमाठ व मालवण भरड या ठिकाणी मनसे व मनवीसे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मालवण मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे १ डिसेंबर रोजी दुपारी २ : ३० वाजता चौके मालवण येथे भव्य स्वागत होईल, त्यानंतर ३ वाजता कुंभारमाठ येथे स्वागत व जानकी सभागृहात कार्यकर्ते सोबत बैठक यावेळी अन्य पक्षातील अनेक जणांचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यानंतर ४ वाजता भरड येथे स्वागत, ४ : ३० वाजता चिवला बीच येथील किल्ला रिसॉर्ट येथे मुक्काम व त्याठिकाणी नागरिक, विविध शिष्टमंडळ व पत्रकार यांच्याशी संवाद साधणार आहेत. २ डिसेंबर रोजी सकाळी राज ठाकरे आंगणेवाडी देवीचे दर्शन घेतल्यावर तेथून कणकवली येथे निघणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page