रानमित्र आचरा आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२९-: पर्यावरण संवर्धनाबाबत मुलांमध्ये आवड आणि निसर्गाबद्दल जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने रानमित्र आचरातर्फे केंद्रशाळा आचरे नं.१ येथे आयोजित पर्यावरणविषयक वकृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे:- वकृत्व स्पर्धा- लहान गट- प्रथम- किंजल परब ( भगवंतगड शाळा), द्वितीय- कृतिका लोहार (कट्टा हायस्कूल), तृतीय- रेवती लाड (श्रावण नं १). वकृत्व स्पर्धा- मोठा गट- प्रथम- करीना राणे ( मुणगे हायस्कूल), द्वितीय-ईशान गोडबोले (देवगड काॅलेज), तृतीय-नियती पेडणेकर (आचरा काॅलेज), निबंध स्पर्धा- लहान गट- प्रथम- स्वराली ताम्हणकर (कट्टा हायस्कूल), द्वितीय- लाजरी कांदळगावकर (ओझर हायस्कूल), तृतीय- नुर्वी शेटगे (आचरा नं १), निबंध स्पर्धा- मोठा गट- प्रथम- निधिश चौगुले ( पिरावाडी हायस्कूल), द्वितीय- रश्मी पांचाळ (कट्टा हायस्कूल), तृतीय- वैभवी परब (ओझर हायस्कूल),
चित्रकला स्पर्धा- प्रथम- रुद्राक्ष मेस्त्री ( कट्टा हायस्कूल), द्वितीय- वेदिका करवडकर (आचरा हायस्कूल), तृतीय- जीवन मेस्त्री (हिर्लेवाडी शाळा), उत्तेजनार्थ – प्रसन्ना घनश्याम प्रभू (आचरा पिरावाडी) यांनी यश मिळविले.

विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पर्यावरणविषयक पुस्तक व रोप देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटनवबक्षीस वितरण डॉ. गणेश मरगज, रानमित्र आचराचे अध्यक्ष – शिल्पन गावकर, केंद्र प्रमुखसुगंधा गुरव, मुख्याध्यापक स्मीता जोशी, पेडणेकर सर, डॉ. मगदूम स्वप्निल गोसावी, नितीन घाडी ,जयप्रकाश परुळेकर, मंदार सांबारी, डॉ. सिद्धेश सकपाळ,निलेश सरजोशी ,मंदार सरजोशी ,राजेश भिवंडेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page