⚡मालवण ता.२९-: रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा आयोजित कथाकथन स्पर्धेत स्नेहल घाडी हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक मयुरेश घाडी याने तर तृतीय क्रमांक सई घुटूकडे हिने मिळविला. उत्तेजनार्थ संस्कार पवार, दिव्या गांवकर, रिद्धी कांबळी यांना गौरविण्यात आले.
श्रीमती रजनी ठाकूर,व श्रीमती विजयालक्ष्मी ठाकूर प्रायोजित या स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे,कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सदस्य अशोक कांबळी, दिपाली कावले, भिकाजी कदम यांच्या हस्ते केले गेले. स्पर्धा यशस्वीतेसाठी ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, सांस्कृतिक समिती सदस्य सौ. कामिनी ढेकणे, गोट्या आचरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
