⚡मालवण ता.२९-: मालवण नगर वाचन मंदिराच्यावतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलची कु. सौरवी देसूरकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक कु. गायत्री गावकर ( टोपीवाला हायस्कुल मालवण ), तृतीय क्रमांक कु. लिखित सरनाईक (भंडारी ज्युनिअर कॉलेज मालवण ) याने पटकावला. या प्रथम तीन स्पर्धकांना रविवार दि. ४ डिसेंबर रोजी रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय मध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत थेट सहभाग मिळाला आहे.
नगर वाचन मंदिरच्या वाचक कक्षात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक श्री. रविंद्र वराडकर व ज्येष्ठ साहित्यिका मेघना जोशी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. आभार प्रदर्शन ग्रंथपाल संजय शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.
