ग्रामपंचायत ‘निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवून यश प्राप्त करेल*

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी व्यक्त केला विश्वास*

⚡मालवण ता.२६-: बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेशासाठी सर्वच ठिकाणावरून प्रतिसाद वाढत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासही अनेकजण इच्छुक आहेत. भाजपासोबत युती करून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, काही ग्रामपंचायतीत बाळासाहेबांची शिवसेना स्वतंत्र ही निवडणूक लढवेल आणि यश प्राप्त करेल, असा विश्वास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर संजय आंग्रे यांनी पहिल्यांदाच मालवण कार्यालयात भेट दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, भास्कर राणे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, किसन मांजरेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरुण तोडणकर, बाळू नाटेकर, नीलम शिंदे, भारती धारगळकर, युटीन फर्नांडीस, राजा तोंडवळकर, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मालवण भरड येथील सौ. सोनाली सर्वेश पाटकर यांनी यावेळी संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. समाजासाठी सातत्यपूर्ण काम करताना पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे सौ. पाटकर यांनी यावेळी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या माध्यमातून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वरिष्ठ स्तरावरूनही भक्कम पाठिंबा असल्याने या निवडणुकीत अपेक्षित यश प्राप्त होईल. गावाच्या, वाडीच्या विकासासाठी आपण कटीबद्द असल्याचेही यावेळी संजय आंग्रे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page