बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

कुडाळ- मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी बबन शिंदे यांची निवड*

⚡मालवण ता.२६-: बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करताना मालवणातील तिघाजणांना संधी देतांना मालवण तालुकाप्रमुख पदावर दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे यात मालवण तालुक्यातून कुडाळ- मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी बबन शिंदे यांची निवड करण्यात आली असून मालवण तालुकाप्रमुख पदी महेश राणे (आचरा, आडवली, मसुरे, सुकळवाड विभाग) आणि विश्वास गावकर (देवबाग, कट्टा, पेंडुर, मालवण शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

मालवण तालुकाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर कार्यालयात आलेले महेश राणे व विश्वास गावकर यांचे कार्यकर्त्यानी पेढे भरवून अभिनंदन केले. यावेळी किसन मांजरेकर, नीलम शिंदे, भारती घारकर, हृत्विक सामंत आदी उपस्थित होते. संघटना मजबुतीसाठी आणि कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे राणे व गावकर यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेबांची शिवसेना कार्यकारिणी जाहीर करताना कुडाळ- मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी बबन शिंदे यांची नियुक्ती करून दोन्ही तालुक्यातील शिंदे यांच्या संपर्क दांडगा असून त्या संपर्काचा फायदा उठवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून होण्याची शक्यता आहे. शिंदे हे यापूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असताना तालुक्यातील महत्वाच्या सर्व सत्ताकेंद्रांवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सप्टेंबर महिन्यात त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांची नियुक्ती विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

मालवण तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी विश्वास गावकर आणि महेश राणे या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विश्वास गावकर यांच्याकडे देवबाग, कट्टा, पेंडूर, मालवण शहर या भागाची जबाबदारी देण्यात आली आहे गावकर हे उद्योजक असून लायन्स क्लब मालवण, मातृत्व आधार फाउंडेशन तसेच इतरही सेवाभावी संस्थांतून काम करीत सामाजिक जाणिव जोपासली आहे तर दुसरे तालुकाप्रमुख महेश राणे हे हॉटेल उद्योजक असून युवा वर्गात त्यांची चांगली क्रेझ आहे. उद्योगमंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांचे जवळचे म्हणून राणे यांची ओळख असून त्यांच्याकडे आचरा आडवली, मसुरे, सुकळवाड हे ग्रामीण भागातील महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून पक्षाची ताकद दाखविण्यासाठी महेश राणे यांच्यावर महत्वाची जबाबदारी असणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अस्तित्व तालुक्यात दाखवून देण्याची जबाबदारी बबन ,शिंदे, विश्वास गावकर, महेश राणे यांच्यावर येऊन पडलेली आहे.

You cannot copy content of this page