ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे : सावंतवाडीत भाजप ओबीसी समाज मेळावा

⚡सावंतवाडी ता.२६-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने प्रथमच देशाला ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला तब्बल ६५ संविधानिक दर्जा दिला. विदर्भातील हंसराज अहिर ओबीसी कमिशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. असे ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली. श्री बावनकुळे हे दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत ते आज सावंतवाडी येथे भाजप ओबीसी समाज मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान राज्यकर्त्यांनी दिलेले मत हे कर्ज म्हणून स्वीकारायला हवे व सत्तेतील पाच वर्षात जनतेची कामे करून त्याची व्याजासहित परतफेड करायला हवी कारण सत्ताधारी म्हणजे मालक नसून ते जनसेवक आहेत याची जाणीव असायला हवी असही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.

You cannot copy content of this page