*💫बांदा दि.०५-:* वाफोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या सदस्या शुभदा आईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर यांनी शुभदा आईर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व सहकारी सदस्य यांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे शुभदा आईर यांनी स्पष्ट केले.
वाफोली ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता असून नियोजनाप्रमाणे उपसरपंच अश्विनी गवस यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. गुरुवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया संपन्न झाली. या पदासाठी भाजपच्या शुभदा आईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी जाहीर केले.
यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजपा बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, सरपंच अक्षता आरोंदेकर, माजी उपसरपंच अश्विनी गवस, वृषाली गवस, सदस्य सोनिया आरोंदेकर, सविता सावंत, युवा मोर्चा चिटणीस विनेश गवस, माजी सरपंच मारुती गवस, ग्रामस्थ चंद्रकांत परब, दिगंबर आईर, संजय आईर, अशोक आईर, प्रदिप आयकर, राजेश गवस, शैलेश गवस आदी उपस्थित होते.
