‘रंग उगवतीचे‘ कवी संमेलन

⚡वेंगुर्ला ता.२१-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला तर्फे दि. १० व ११ डिसेंबर रोजी होणा-या तिस-या त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून ९ डिसेंबर रोजी बॅ. खर्डेकर महाविद्यालय येथे ‘रंग उगवतीचे‘ हे तालुकास्तरीय कवी संमेलन आयोजित केले आहे. सहभागी कवींनी स्वरचित अशी आपली एक कविता यामध्ये सादर करावयाची आहे. कविता २० ओळी पेक्षा जास्त नसावी.

  या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. तरी वेंगुर्ला तालुक्यातील ज्या कवींना या कवी संमेलनामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आपली नावे प्रितम ओगले (९४२१६३१४४१) यांच्याकडे द्यावीत. काव्यरसिकांनी या रंग उगवतीचे या कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आनंदयात्री वाङ्मय मंडळामार्फत वृंदा कांबळी, प्रा.सचिन परुळकर, प्रा.आनंद बांदेकर व संजय पाटील यांनी केले आहे.
You cannot copy content of this page