जेरॉन फर्नांडिस व रुजाय फर्नांडिस यांना जॉन पिंटो स्मृती पुरस्कार जाहीर

⚡मालवण ता.२१-:
सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिस्ती विकास मंडळ मुंबई द्वारे देण्यात येणारा २०२० सालचा स्व. जॉन पिंटो स्मृती पुरस्कार आचरा येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जि. प. सदस्य जेरोन बस्त्याव फर्नांडिस यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ सालचा स्व. जॉन पिंटो स्मृती पुरस्कार चिंदर / मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते रुजाय किस्तु फर्नांडिस (आर के) यांना जाहीर झाला आहे.

सदर पुरस्कार वितरण समारंभ दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी मालवण तालुक्यातील आचरा- जामडुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. दोघांचेही संस्था अध्यक्ष पास्कॉल लोबो, सरचिटणीस विल्यम फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page