कट्टा परिसरातील १०० बालकांना स्वेटर वाटप

⚡मालवण ता.२१-: आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या सहकार्याने बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा, हडपीवाडी, कावळेवाडी, कुसरवे या ठिकाणी सुमारे शंभर बालकांना स्वेटर वाटप करण्यात आले. यासाठी सौ. प्रतिभा हुल्याळकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

यावेळी वैष्णवी लाड यांनी सौ. प्रतिभा हुल्याळकर यांनी या थंडीमध्ये चांगल्या प्रतीची स्वेटर देऊन अनेक बालकाना मायेची पाखरच घातली आहे. त्या बद्दल सर्वांनी त्यांचे व ज्यांच्यामुळे ही मदत आपणास मिळाली त्या रोटरीयन रश्मी पाटील यांच्या विषयी कृतज्ञ राहायला हवे, असे सांगितले. सेवांगणच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. आशा स्वयंसेविकांच्या समन्वयक सौ. नाईक यांनी सर्व बालक व पालक यांच्यावतीने सौ. प्रतिभा हुल्याळकर यांचे आभार मानत सेवांगण आता नवजात बालकांसाठी सुद्धा उपक्रम राबवतय याचा आनंद वाटतोय असे सांगितले. सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनीही प्रतिभा हुल्याळकर व रश्मी पाटील यांचे आभार मानले. यावेळी १०० बालकांना स्वेटर, कानटोपी, विजार व बिस्किट पुडा भेट देण्यात आला. या कार्यक्रमास किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, वैष्णवी लाड, सुजाता पावसकर, सौ. नाईक, सौ. ढोलम, रीटा डान्टस, अंगणवाडी सेविका वेंगुलेकर, आपा परब, मिठबावकर, देवीदास गोंधळी, चंद्रकांत घोगळे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page