⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी ओरोस रुग्णालयात करण्यात आली होती. या तपासणीत ५३ विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळून आला. या सर्व विद्यार्थ्यांना सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या व मानव साधन विकास संस्थेमार्फत उमा प्रभू यांच्या सहकार्याने वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय येथे मोफत चष्मे पाटप करण्यात आले.
यावेळी परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक विलास हडकर, कॉनबॅकचे मोहन होडावडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत, ज्ञानेश्वर केळजी, ग्रामीण रुग्णालयाच्या डीसोझा, मनवेल फर्नांडीस, विजय बागकर, शेखर काणेकर, दशरथ गडेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू सामंत उपस्थित होते.
परिवर्तन केंद्रामार्फत वर्षभरापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना १०० स्थानिक संस्थांच्यामार्फत १००० मोफत शिलाई मशिनचे वाटप करणे आले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११४ शाळातील १००० मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आली.
