*💫मालवण दि.०५-:* रेकोबा मित्रमंडळ वायरी मालवण आणि माघी गणेश जयंती उत्सव मंडळ वायरी मालवण यांच्यावतीने संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सिद्धिविनायक पटांगण, शासकीय तंत्रनिकेतनच्या शेजारी, कुंभारमाठ येथे माघी गणेश जयंती उत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे उत्सवाचे ११ वे वर्ष असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, सायंकाळी ४ वाजता गणेश आगमन सोहळा, १५ रोजी सकाळी १० वाजता गणेश मूर्तीचे पूजन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता महाआरती, ७ वाजता संगीत भजन, रात्री ९ वाजता गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळ, दाभोलीचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग श्रेष्ठत्वाची लढाई, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता महाआरती,. सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ वाजता ओम चैतन्य गगनगिरी भजन मंडळ, उंबर्डेचे बुवा श्रीकांत शिरसाट (पखवाज विशाल राणे) विरुद्ध भूतेश्वर भजन मंडळ, खुडीचे बुवा संतोष जोईल (पखवाज-श्याम तांबे, तबला-अक्षय मेस्त्री) यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता महाआरती, सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर, सायंकाळी ७ वाजता संगीत भजन, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. स्पर्धा दोन गटात होणार असून मोठ्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ७००० रुपये , ५०००रुपये , ३००० रुपये , तर लहान गटातील विजेत्यांना ५००० रुपये ३००० रुपये , २००० रुपये देण्यात येणार आहेत. १८ रोजी सकाळी ८ वाजता महाआरती, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता संगीत भजन, रात्री ९ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार मंडळाचा ‘नरसिंह तेजहरण’ नाट्यप्रयोग होणार आहे. १९ रोजी सकाळी ८ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गणेश विर्सजन सोहळा होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन रेकोबा मित्रमंडळ व माघी गणेश जयंती उत्सव मंडळाने केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संजय लुडबे, सौ. संजीवनी लुडबे, मंदार लुडबे यांनी केले आहे.
मालवण येथे १४ ते १९ फेब्रुवारी कालावधीत माघी गणेश जयंती उत्सव…
