महाराष्ट्र राज्यस्तरीय नक्षत्रांचे देणे काव्यमंच आयोजित काव्यलेखन स्पर्धेत मंदार श्रीकांत सांबारी प्रथम…

*💫मालवण दि.०४-:* नक्षत्रांचे देणे काव्यमंच गोरेगाव, मुंबई तर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्य लेखन स्पर्धेत आचरा येथील कविवर्य मंदार श्रीकांत सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रस्ता या विषयावर आधारित हि काव्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिक येथील डॉ माधुरी बागुल यांनी द्वितीय तर करमाळा सोलापूर येथील उज्वला देवी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे परीक्षण कविवर्य सुभाष मोरे यांनी केले.

You cannot copy content of this page