हिम्मत असेल तर अडवाच; एकनाथ नाडकर्णी यांचा इशारा*
*💫बांदा दि.०४-:* हिम्मत असेल तर शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ आणि दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी तिरडी यात्रा रोखण्यासाठी येऊन दाखवावेच असे प्रति आवाहन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिले असून, आता तर पालकमंत्र्यांसह रुपेश राऊळ आणि बाबुराव धुरी या दोन्ही तालुका प्रमुखांची एक इंच काय तर दोडामार्ग पर्यंत तिरडी यात्रा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच बांधकाम विभागाकडे जर हा रस्ता दुरुस्ती करण्यास पैसे नसतील तर भाजप रविवारी भिख मागो आंदोलन करून जमलेले पैसे बांधकाम विभागास देईल असा इशारा बांदा सरपंच अक्रम खान यांनी यावेळी दिला आहे. आज अचानक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गडगेवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत बांदा दोडामार्ग राज्य महामार्गावर आंदोलन छेडत महामार्ग दोन तास बंद केला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी येथे आलेल्या बांधकाम उप अभियंता चव्हाण यांनी १ मार्च पर्यंत या रसत्या बाबत निवेदिता काढण्याच्या आश्वासनानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
