नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक रंगतदार होणार

कोण होणार सरपंच? याकडे सर्वांचे लक्ष

⚡कणकवली ता.१२-:
कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक यावेळी मात्र रंगतदार होणार असून भारतीय जनता पार्टी व इच्छुक उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातच दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या निवडणुकीत कोण होणार सरपंच याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या ग्रामपंचायत निवडणूक वेळी ग्रामपंचायत सदस्य एक वगळता बिनविरोध निवड झाली होती. अशी यावेळी सदस्य तरी बिनविरोध निवड होईल का ? हे सांगता येणार नाही.
मागील मागील ग्रामपंचायत निवडणूक वेळी ग्रामपंचायत 11 सदस्य पैकी नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले होते व प्रभाग वाघाचीवाडी मध्ये फक्त एकाच ओबीसी जागेसाठी दुरंगी लढत झाली होती. व एक अनुसूचित जाती जमातीतील जागा अद्यापही रिक्तच राहिली आहे. त्यावेळी थेट सरपंच निवडणुकीत एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. त्यावेळच्या स्वाभिमान पक्षाकडून आफ्रोजा यासीन नावलेकर या 1063 मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला होता.आणि एक हाती सत्ता स्वाभिमान पक्षाची आली होती. यानंतर सर्व स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आल्यानंतर सदर ग्रामपंचायत भाजपमय झाली होती.मध्यंतरी महाविकास आघाडी वेळी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत नांदगाव तिठा येथील 2 ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. यामुळे नांदगाव येथील भाजपचे 7 तर शिवसेनेचे 3 सदस्य संख्या झाली होती.
येणाऱ्या काही दिवसांतच ग्रामपंचायत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असून उमेदवार कोणाविरुद्ध कोण ? हे सुध्दा स्पष्ट होईलच. तशा दोन्ही पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या असून निवडणूक जाहीर होताच वाडीवार , प्रभाग बैठका सुरू झालेल्या दिसत आहे.

You cannot copy content of this page