⚡सावंतवाडी ता.१२-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या माजी शिक्षिका इंदिरा गजानन भागवत उर्फ भागवत बाई (८३) यांचे शुक्रवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने फोंडा गोवा येथे निधन झाले.
मळगाव हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाच्या शिक्षीका म्हणून त्यांनी काम पाहिले होते. स्काऊट गाईड आदी विषयही त्या शिकवत होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मळगाव गावात शोककळा पसरली आहे. मुंबई ऐक्यवर्धक संघ, मळगाव हायस्कूलची शालेय स्थानिक सल्लागार समिती तसेच मळगाव हायस्कूलच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व आजी माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. शनिवारी सकाळी गोवा फोंडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मळगाव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य गजानन भागवत यांच्या त्या पत्नी होत.
