यू जी सी च्या नेट परीक्षेत दर्शना शिरोडकर उत्तीर्ण

गोगटे वाळके महाविद्यालयाची आहे माजी विद्यार्थिनी

बांदा/प्रतिनिधी
यु.जी.सी. मार्फत घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत येथील गोगटे-वाळके कॉलेज, बांदाची माजी विदयार्थीनी दर्शना रविंद्रनाथ शिरोडकर ही मराठी विषयातून उत्तीर्ण झाली.
दर्शना शिरोडकर हिने आपले पदव्युत्तर शिक्षण गोगटे- वाळके कॉलजमधून पूर्ण केले. मळगाव, ता. सावंतवाडी येथील ती रहिवासी असून तिला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर, डॉ. एन. डी. कार्वेकर, प्रा. हर्षवर्धिनी सरदार यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डी. बी. वारंग, उपाध्यक्ष प्रमोद कामत, सचीव एस. आर. सावंत, सहसचीव डी. एस. पणशीकर, खजिनदार टी. एन. शेटकर यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो :-
दर्शना शिरोडकर.

You cannot copy content of this page