नांदगाव येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर

⚡कणकवली ता.१२-: श्री देव रवळनाथ, श्री पुर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी,श्री मुळ आकार- श्री गणेश मंदिर उत्सव समिती नांदगावच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या . यामध्ये अंगणवाडी ते 4 थी बाल गट तर तर पुढील खुला गटात समावेश होता.
अंगणवाडी ते चौथी गटामध्ये प्रथम क्रमांक भूमी मर्गज , द्वितीय स्वरा दिलीप जाधव, व तृतीय क्रमांक विभागून दोघांना देण्यात आला त्यामध्ये ओमकार ऋषिकेश मोरजकर व तनया तुषार मेस्त्री , तर उत्तेजनार्थ म्हणून ओवी विडकर हीला देण्यात आला आहे. तर खुल्या गटात अनुक्रमे प्रेक्षा तुषार मिस्त्री शितल तांबे आरती भाट व उत्तेजनार्थ म्हणून ओमकार वाळके याला देण्यात आला आहे.
दोन्ही गटातील विजेत्या अनुक्रमे तीन स्पर्धकांना रोख रक्कम स्वरुपात पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page