पिंपरी चिंचवड येथील दशावतारी नाट्यप्रयोग प्रसंगी राष्ट्रवादीच्या अर्चना घारे परब यांचे प्रतिपादन;पिंपरी चिंचवड येथील सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे आयोजन: मिळाला मोठा प्रतिसाद
⚡सावंतवाडी ता.१२-: दशावतारी कला म्हणजे कोकणचा जीव. कोकणातल्या मातीत रुजलेली आणि बहरलेली लोककला म्हणचे दशावतार. सभागृह प्रेक्षकांनी तुडुंब भरले आहे. ही गर्दी सांगते की, आपल्या गावापासून, आपल्या माणसांपासून, आपल्या मातीपासून शेकडो किलोमीटर दूर राहून देखील आपला कोकणी माणूस, आपला कोकण, आपली माणस, आपली संस्कृती विसरला नाही. कोकणी माणसाची नाळ आपल्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. हेच यावरून सिद्ध होते.” असे प्रतिपादन कोकण विभागीय राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ अर्चना परब यांनी केले.
सिंधुदुर्ग युवा ग्रुप पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने संत तुकाराम नगर पुणे येथे ‘शाप- प्रतिशाप’ या दशावतारी प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ.घारे परब बोलत होत्या. या नाट्यप्रयोगाला नाट्य रसिकांचा देखील उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
