⚡बांदा ता.११-: आरोस-गिरोबावाडी मंदिराजवळील विहिरीच्या लघु नळ योजना कामाचे भूमिपूजन शिवसेना सावंतवाडी संपर्कप्रमुख राजू नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच शंकर नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजन नाईक, तसेच दत्ताराम नाईक, जयानंद नाईक, बाबुल नाईक, दाजी नाईक, हरीश रहाटे, गजा सावंत, अक्षय बांदिवडेकर, बाळा शिरोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचायत समिती माजी सदस्य रेश्मा राजू नाईक यांच्या निधीतून सदर काम मार्गी लागल्याचे गुरू नाईक यांनी सांगितले. या कामासाठी शिवसेना मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी विभागप्रमुख गुरुनाथ नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.