शहरा नजिक गावातील प्रकार: पाच जण ताब्यात;कारवाईसाठी डी वाय एस पी डॉ रोहिणी शेळके आक्रमक
⚡सावंतवाडी ता.११-: येथील शहरालगत असलेल्या एका गावात गुरुवारी मध्यरात्री जत्रेदरम्यान सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. दस्तूर खुद्द सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत अनिल सुमन नाईक (झिंरगवाडी ), साईद नासीर शेख (कोलगाव ), दिपक न्हानु राऊळ (कोलगाव भोमवाडी ), नितेश दत्ताराम म्हाडगुत (लाडाचीबाग ), केतन पुरुषोत्तम देऊलकर (जुनाबाजार सावंतवाडी ) हेमंत शांताराम राऊळ (कोलगाव ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.