⚡मालवण ता.१०-: सिंधुरत्न कलामंच, मालवणतर्फे दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे खुली जोडी नृत्य स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकास २१ हजार व करंडक, द्वितीय क्रमांकास ११ हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी विकी जाधव – ९४०४१८६१७६, संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मालवणात खुल्या जोडी नृत्य स्पर्धेचे आयोजन
