⚡मालवण ता.१०-: मालवण पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा वराड पंचायत समिती मतदारसंघाच्या माजी सदस्या, – तळगावच्या रहिवासी सौ. चित्रा चारुहास दळवी (वय ५०) यांचे राहत्या घरी हृदयविकाराचा धक्क्याने निधन झाले.
तळगावात भाजप नेते नारायण राणे यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. उपसभापतीपदाच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे मार्गी लावली होती. त्यांच्या अचानक निधनाने तळगाव गावावर शोककळा पसरली आहे. तेथील स्मशानभूमी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.