संभाजीराव रावराणे, माजी सभापती रमेश तावडे, वसंत खानविलकर यांचा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश
वैभववाडी संजय शेळके
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने वैभववाडी तालुक्यात उद्धव ठाकरे गटाला मोठी खिंडार पाडले असून सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत व माजी खासदार सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत. विद्यमान जिल्हा कार्यकारी सदस्य तथा माजी उपतालुकाप्रमुख संभाजीराव रावराणे,यांच्यासह माजी सभापती रमेश तावडे वसंत खानविलकर यांच्यासह तालुक्यातील सात गावातील ठाकरे गट शिवसेना शाखाप्रमुखकानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्यातील संतांचा नंतर प्रथमच वैभववाडी तालुक्यात आगमन झालेल्या किरण सामात यांनी उद्धव ठाकरे गटाला वैभववाडी मोठा झटका दिला आहे. मंगळवारी नावळे येथे संभाजी रावराणे यांच्या निवासस्थानी नावळे शाखाप्रमुख सोनू गुरखे आरूळे शाखाप्रमुख आप्पा सुतार, सांगुळवाडी शाखाप्रमुख शशी रावराणे, करुळ शाखाप्रमुख संतोष साटम ,कुंभवडे शाखाप्रमुख सत्यवान शिंदे कोकिसरे शाखाप्रमुख कमलाकर सरवणकर, कुंभवडे सोसायटी चेअरमन बाबू चव्हाण नावळे तंटामुक्ती अध्यक्ष आत्माराम गुरव, यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला
यावेळी माझी जि प सदस्य संजय आग्रे, संदेश पटेल, भास्कर राणे ,शेखर राणे, सुनील पारकर, भूषण परुळेकर, महेंद्र सावंत, आदी उपस्थित होते एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या पक्ष प्रवेश हा उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा मानला जात असून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पक्षाला तालुक्यात मजबुती देणारा ठरणार आहे.