बरबाद होणाऱ्या युवा पिढीला वाचविण्यासाठी आहे
आ नितेश राणे
⚡देवगड ता.०८-: देवगड जामसंडे परिसरातील अवैद्य धंदे मटका जुगार अमली पदार्थ या विरोधात आपण सुरू केलेला लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा राजकीय व्यक्तीच्या विरोधात नसून देवगड जामसंडे शहराच्या व युवा पिढीच्या भविष्यासाठी आहे. शहरात अशा पद्धतीने मटका जुगार अथवा अमली पदार्थाच्या आहारी जाऊन शहरातील युवा पिढी बरबाद होऊ नये यासाठीच आपण हा लढा उभारला आहे. प्रसंगी या मटका जुगार धंद्यात ऑनलाइन चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आले असून युवा पिढी यामध्ये बरबाद होऊ शकते,असे सांगून याबाबत आवश्यक ती ठोस कारवाई करावी याकरिता आपण यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्यवसायाची व राजकीय व्यक्तींची नावे ही दिली आहेत. या व्यक्तीं ज्या ठिकाणी अशा परिस्थितीच्या गोष्टी केल्या जातात अशी हॉटेल रेस्टॉरंट आहेत याकडे पोलीस अधीक्षक तसेच पोलीस प्रशासन तत्परतेने पाहतील असा आपला विश्वास असून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेले बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार निश्चितपणे याला योग्य ते उत्तर देईल. भविष्यात अशा पद्धतीच्या कोणत्याही अवैध धंदे होता कामा नये याची दक्षता पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासन यांनी वेळीच घेतली नाही, यावर आवश्यक ती कारवाई अथवा निघाला नाही तर यापूर्वीच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला मोर्चा आपण १५ नोव्हेंबर रोजी काढणार असल्याचे सूतोवाच आम. नितेश राणे यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या आमदार संपर्क कार्यालयात बोलताना व्यक्त केले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, देवगड जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम,देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठु करूल,देवगड जामसंडे युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर उपस्थित होते.
यापुढे बोलताना आम. नितेश राणे म्हणाले, देवगड जामसांडे शहरांमध्ये मटका जुगार अमली पदार्थ अवैध धंदे या संदर्भात आपण यापूर्वी आवाज उठविला असताना त्या अनुषंगाने देवगड पोलीस स्थानकात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी भेट दिली त्या वेळी त्यांची भेट घेऊन आम.नितेश राणे यांनी वस्तुस्थिती कथन केली सर्वप्रथम देवगड वासियाना लोकप्रतिनिधींनी या नात्याने या विषयाचे गांभीर्य स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस घेतले असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक यांनी कडक पाऊल उचलले आहे हे बघून सत्तेमधील आमदार या नात्याने आपण देवगड वासियांचे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आभार मानतो.
महाराष्ट्रात असलेल्या भाजप आणि बाळासाहेब शिवसेना युतीचा आपल्याला गर्व व अभिमान असून यापूर्वी असंख्य घटना या पडद्यामागून देवगड जामसंडे परिसरात घडत आहेत त्याबाबत माहिती आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. कोण काय बोलताहेत? पोलीस खात्याचे काही अधिकारी ,कोणते अधिकारी कर्मचारी पोलीस अड्ड्यावर जाऊन आता बंद करा !समजून घ्या, काही दिवस बंद ठेवा! पुढचे पुढे बघू! अशा प्रकारचे वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींबाबत आपण यापूर्वीच पोलीस प्रशासन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना योग्य ती माहिती ठिकाणांसह व नावांसहित दिलेली असल्याचे सांगून देवगडात जिल्हा पोलीस अधीक्षक येणार आहेत याची माहिती मिळताच देवगड पोलिसांनि प्रसिद्धी माध्यमां मधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने समजली असता सोमवारी रात्री १०.३० सुमारास देवगड कॉलेज रोड नजीकच्या अवैध मटका जुगार धार पडते ही धार पडली ,टाकली की पाडली जाते. याची चौकशी अधिकाऱ्यांनी करावी. असेही आपण सांगितल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. दौरा जाहीर झाल्यानंतर धाड पडते व ती माहिती यापूर्वी पोलिसांना नव्हती काय ?अशी विचारणा य करून हा लढा एका व्यक्तीच्या अथवा पक्षाच्या विरोधात नाही. या पूर्वी देखील कणकवली सारख्या शहरात देखील अशा प्रकारच्या मटका जुगार अमली पदार्थांच्या आहारी जाऊन तेथील युवा पिढी अशा पद्धतीने बरबाद होत होती व त्यावेळेस आपण लढलो आणि त्यानंतरच कणकवली नगरपंचायत मध्ये समीर नलावडे सारखे नगराध्यक्ष निवडून आले. तोच लढा या पुढील काळात देवगड जामसंडे येथील तरुण पिढीसाठी लढावा लागतो .अशा अवैध धंद्यात मोजके अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत .मटका धंदा सुरू असताना ऑनलाइन जुगार नावेही आपण दिली असून या सर्व गोष्टी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीत सांगितल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. यामध्ये कुणाचीही गय करू नका जे अशा अवैध गोष्टीत असतील तो आमचा असेल अथवा तुमचा असेल असं न करता अवैद्य धंद्यावाल्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आपली भूमिका असून राजकीय व्यक्तींची नावेही आपण दिले आहेत या व्यक्तींवरही आपण बारकाईने लक्ष ठेवावे. तशी मागणी ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
यापूर्वीच्या परिषदेत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष यांना या अवैद्य धंद्याबाबत आपली भूमिका जाहीर करावी अशी सूचनाही आपण केली होती परंतु त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रावर त्यांची सही देखील नसून त्यांचे प्रसिद्ध पत्रक हे नगराध्यक्ष यांना विश्वासात घेऊन दिले का? की त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाले त्याखाली सही लागते ती सही प्रसिद्ध पत्रकावर नसून यापूर्वीही नगराध्यक्ष यांनी ठिकठिकाणी अशा पद्धतीने सह्या केल्या आहेत. त्या सह्या त्यांच्याच आहेत की अन्य कोणी केले आहेत याची माहिती देखील आपल्याकडे असून नगराध्यक्षा यांच्या सहीचा वापर कशा पद्धतीने केला जातो याची माहिती आपण घेतली असून येथील नगराध्यक्ष यांचा राजकीय बळी घेण्याचा कोणी प्रयत्न करतो? त्यांनी केलेल्या सह्या घेतल्या जातात. केंद्र व राज्य सरकारच्या सरकारी टेंडर आहेत त्यावर नगराध्यक्ष आणि विश्वासात घेऊन सह्या केल्या आहेत का याचे उत्तरे त्यांनी आपल्याला व देवगड जामसंडे जनतेला द्यावे अशी सूचनाही यावेळी आम.नितेश राणे यांनी नगराध्यक्ष यांना केली आहे. असे कागदपत्र आपल्याकडे असून ते योग्य वेळी सादर करेन यावर नगराध्यक्षांच्या सही असतील त्याला त्या निश्चितपणे जबाबदार असेल परंतु त्यांचा राजकीय वेळी घेण्याचा कोणी प्रयत्न करतो का याचीही माहिती घेणे महत्त्वाची आहे जेणेकरून त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती ही नाजूक असून प्रसंगी केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पाला देखील सह्या केल्या गेल्या आहेत त्यातून भ्रष्टाचार बाहेर आला व त्यांची स्वाक्षरी आढळून आली तिच्या अडचणीत येतील असे त्यांनी त्यानिमित्ताने नमूद केले ती माहिती आपण या पुढील काळात देणार आहोत. मटका जुगार अंमली पदार्थ अवैद्य धंदे यात हि राजकीय पदाधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांची अशा व्यक्तींची नावे आपण जाहीर करणार असून या पुढील काळात छोट्या मोठ्या कारवाई करून पोलीस प्रशासनाने छोट्या-छोट्यापर्यंत न पोचता मुख्य सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचायचे आहे आणि हे जोपर्यंत पोलीस प्रशासनामार्फत केले जाणार नाही. तोपर्यंत हा लढा असा चालू ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद आवर्जून सांगितले. ज्यावेळी अशा अवैध धंद्या वर करण्यात येणारी कारवाई योग्य दिसेल. त्याचवेळी आपले समाधान होणार असल्याची त्यांनी शेवटी नमूद केले या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भेटीच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अगरवाल यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली असल्याचे सांगितले . त्यांच्या या प्रयत्नांना यश येईल असा विश्वासही आम. नितेश राणे यांनी देवगड येथील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
