⚡सावंतवाडी ता. ०८-: बैलाच्या हल्ल्यात तळवडे येथील शंकर भास्कर राऊळ (५५) या वृद्धाचा अधिक उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला.
ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली होती.
गंभीर जखमी राऊळ यांना प्रथम प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गोवा-बांबुळी येथे नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
