⚡मालवण ता.०८-: आचरा व्यापारी संघटनेचे जेष्ठ व्यापारी, गजानन मेडिकल स्टोअरचे मालक विनायक परब यांचा कनिष्ठ मुलगा डॉ. विशाल विनायक परब (वय ३७ ) याचे अल्पशा आजाराने सोमवारी आचरा येथे दुःखद निधन झाले. ते मुंबईत रुग्णसेवा बजावत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, आई, भाऊ असा परिवार आहे. आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विद्यानंद परब यांचा तो छोटा भाऊ होत. डॉ विशाल यांच्यावर चुनवरे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले विशालच्या आकस्मिक मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
