मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि मंत्री पदावरुन हकाल्पट्टी करा

राष्ट्रवादी नेते आसिफ ख्वाजा यांची मागणी..

⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान मंत्री मंडळातील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा संसद रत्न प्राप्त मा, सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अश्लील टिका करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या सह देशातील तमाम महिला वर्गाचा अपमान करून संसदीय संविधानाची पायमल्ली केली आहे,एका संविधानीक घटनेनुसार राज्य मंत्रिमंडळात मंत्री पदावर असणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ते शोभादायक नाही,सदर घटना ही लोकशाही प्रधान देशात भूषणावह नाही,या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे निषेध आंदोलन होत आहे,तसेच अशा बेजबाबदार मंत्र्यांची राज्य मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्या विभाग आसिफ ख्वाजा यांनी केली आहे .

You cannot copy content of this page