ओरोस ता.०१-:
जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार यांनी फळ पीक विमा उतरवून आपले फळ पीक संरक्षित करावे, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी रिलायन्स इन्श्युरंस कंपनीचा चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला आहे. हा चित्ररथ १० नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात फिरून फळ पीक विम्या बाबत मार्गदर्शन करणार आहे. याचा शुभारंभ आज तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याहस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.
सिंधुदुर्गातील आंबा, काजू या मोठ्या फळ पिकांबरोबर केळी या पिकाचा रब्बी हंगामासाठी विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी शासनाने रिलायन्स इन्श्युरंस कंपनीची नियुक्ती केली आहे. याच्या माध्यमातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यात पीक विमा योजनेची जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी रिलायन्स कंपनीचा चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर महसूल विभागाचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याहस्ते झेंडा दाखवून चित्ररथ द्वारे प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कोरडवाहू क्षेत्र विकास अधिकारी अरुण नातू, जिल्हा विमा प्रतिनिधी सिध्देश येडवे, कृषी पर्यवेक्षक सभाजी घाडी, डाटा एंट्री ऑपरेटर स्वामीनी परब, स्मिता काळप, तालुका विमा प्रतिनिधी जीवन राणे आदी उपस्थित होते.
