उगाच संविधानाच्या गोष्टी काढून संतप्त होऊ नका!

महिंद्र सावंत यांचा काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांना टोला

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी महाराष्ट्र राज्य सरकार वर टिका करताना हे असंविधनिक सरकार आहे असे म्हटले आहे.आपण ज्या पदावर आहात तर तुम्हाला हेही कळू नये की संविधानात काय सांगितले आहे ज्याच्या आमदारांची संख्या विधानसभेत आहे त्याच राज्य असणार.असा टोला बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलेले महिंद्र सावंत यांनी लगावला आहे.

महिंद्र सावंत म्हणतात,मुळात तुम्ही काँग्रेसच्या घटनेप्रमाणे जिल्हाध्यक्ष आहात का ते बघा,कार्याध्यक्ष असताना तुम्ही जिल्हाध्यक्ष झालेच कसे?आणि आता ऑनलाईन पद्धतीने काँग्रेसचे सदस्य नोंदणी होऊन नवीन जिल्हाध्यक्ष होणार तेव्हा उगाच संविधानाच्या गोष्टी काढून संतप्त होऊ नका.महाविकास आघाडीचे सरकार असताना काय विकास कामे केली,कुठले प्रकल्प आणले ते जाहीर करा,असे महिंद्र सावंत यांनी इर्शाद शेख यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

You cannot copy content of this page