काँग्रेसच्या रांगोळी स्पर्धेचा उज्वला गावडे यांनी केले उद्घाटन

आरपीडी हायस्कूल येथे दीपावली शो निमित्त आयोजन,आहारतज्ञ डॉ विनया बाड यांची प्रमुख उपस्थिती

सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने रविवारी 30 ऑक्टोबरला दिपावली शो टाईमच्या निमित्ताने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .


आरपीडी हायस्कूलच्या हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धे चे उद्घाटन सातेरी महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ उज्वला गावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले.

यावेळी आहाराततज्ञ डॉ विनया बाड यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर माजी महिला तालुकाध्यक्ष अमिदी मेस्ञी शहराध्यक्ष ऍड राघवेंद्र नार्वेकर तालुका उपाध्यक्ष अशोक राऊळ, विभागीय अध्यक्ष अँड. गुरुनाथ आईर, जस्मिन लक्ष्मेश्वर रवींद्र म्हापसेकर चंद्रकांत राणे नूतन सावंत स्मिता वागळे गीता सावंत,सौ उल्का सांगेलकर,सौ अनुराधा पवार प्रणाली सावंत, संकेत सावंत
आदी उपस्थित होते
यावेळी सुरुवातीला शिक्षण प्रसारण मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष विकासभाई सावंत यांनी शुभेच्छा देत, पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले यावेळी बोलताना ते म्हणाले मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा संस्कृती जपावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे यात सहभागी होऊन आपले कला कौशल्य स्पर्धकाने दाखवावे असे आवाहन त्यांनी केले स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या
तर दिवाळीच्या पाच ते सहा दिवसांमध्ये उत्सवाची सर्वांनाच घाई गडबड असते त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिवाळीच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहार तज्ञ डॉ विनया बाड यांनी आहाराविषयी माहिती दिली त्या म्हणाल्या घरात काय शिजते तेच मुले खातात संतुलित आहार घेतल्याने भविष्यात होणाऱ्या आजाराला आळा बसतो चाळीस वयोगटानंतर डायबिटीस येतो त्यामुळे संतुलित आहार ठेवावा वजन नियंत्रित ठेवावे व्यायाम सर्वांसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले हिरव्या पाल्या भाज्या मोड आलेले धान्य तर मांसाहारासाठी चिकन मटण अंडी आहारात आवश्यक आहेत परंतु त्याचे प्रमाण आणि खाण्याची वेळ महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या
राणी पार्वती देवी ज्युनिअर काँलेजच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन जिल्हा युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष
कु. जास्मिन लक्ष्मीश्वर, आणि महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. अमिदी मेस्त्री, यांनी केले सावंतवाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिपावली शो टाईमचे आयोजन करण्यात आले . सावंतवाडी तालुक्यातील महिला आणि मुलीं साठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये बहुसंख्य महिला आणि मुलींनी सहभाग घेतला तर सहभागी स्पर्धकांना सुद्धा यावेळी आकर्षक भेटवस्तू यावेळी देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण बाबुराव मालवणकर यांनी केले आणि स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण सिंधुदुर्ग काँग्रेस संपर्क माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी यावेळी सांगितले

You cannot copy content of this page