डॉ आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या

बिडीओ जयप्रकाश परब यांचे अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना आवाहन

वैभववाडी संजय शेळके
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक जय प्रकाश परब यांनी केले आहे.
     या योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरीसाठी २लाख ५० हजार रुपये जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ५०  हजार रुपये, इनवेल बोरिंगसाठी २० हजार रुपये, पंप संचासाठी २० हजार रुपये, वीस जोडणी साठी १०  हजार रुपये, अस्तरीकरणासाठी १ लाख रुपये,तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुक्रमे २५ व ५० हजार रुपये अशी अनुदानाची मर्यादा राहणार आहे.

शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावे किमान  ०.४० हेक्टर कमाल ६ हेक्टर जमिन असली पाहीजे.  नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर लाभ घेण्सासाठी किमान ०.२० हेक्टर जमिन आवश्यक. सामुहीक शेतजमिन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकञित कुटुंब नवीन विहिर या घटकांचा लाभ घेण्यास पाञ असेल.  सामूहिक शेत जमिनीवर लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचा इतर सह इसेदारांचे संमती पत्र सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे ७/१२ ८ अ लाभार्थ्याचे आधार कार्ड ,बँक खाते बुक, तसेच सन 21 22 च्या उत्पन्नाचा १  लाख ५० हजार  मर्यादिततील उत्पन्न दाखला. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी htt.mahabtmahait.gov.in

संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल ऑनलाइन अर्ज भरून ग्रामसभेच्या शिफारशीने आवश्यक कागदपत्रांसह त्याची प्रत गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे सादर करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यास ची कार्याल मर्यादा असल्याने पात्र शेतकरी त्वरित ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर समितीमार्फत मंजूर करण्यात येणार आहे वैयक्तिक लाभार्थी निवडताना महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणारा असून ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे अनुदानाची रक्कम थेट हस्तांतर पद्धतीने लाभार्थ्याच्या आधार नोंदणी केलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन गटविकास अधिकारी परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page