तारकर्ली देवबाग समुद्र किनाऱ्यावर राबवली स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.२८-: जिज्ञासा फाउंडेशनच्या वतीने २५ ऑक्टोबर रोजी देवबाग तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये संस्थेचे सदस्य तसेच स्थानिक हॉटेल व्यावसायिक व महिला सामील झाल्या होत्या.

देवबाग तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर जिज्ञासा फाउंडेशन या संस्थेने तारकर्ली एमआयडीसी ते देवबाग संगम अशा पाच किलोमीटर च्या किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेसाठी साधन सामग्री रजत दळवी व विंडमील हॉटेलचे मालक यांनी हँड ग्लोव्हज व कचरा गोळा करण्यासाठी पिशव्यांची मदत केली. तर सुरज भोसले, बाबली चोपडेकर, वैभव खोबरेकर यांनी अल्पोपहाराची सोय केली. या मोहिमेमध्ये स्थानिक व्यावसायिक तसेच यूट्यूबर लकी कांबळी, अंकिता प्रभूवालावलकर, मंदार शेट्ये हे देखील सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page