दोन दिवसात बी एस एन एल टॉवर दुरुस्त करा

अन्यथा पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार;उपसरपंच प्रवीण देसाई यांचा इशारा

बांदा/प्रतिनिधी
डेगवे बाजारवाडी येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएलच्या मोबाईल मनोऱ्याच्या बॅटरी चोरीस गेल्याने गेले पंधरा दिवस टॉवर बंद आहे. यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आज टॉवरची पाहणी करण्यासाठी आलेल्या दुरसंचारच्या अधिकारी व कर्मचारी यांना याठिकाणी रोखून धरत जाब विचारला. तसेच बॅटरी चोरीला जाऊनही अद्यापपर्यंत पोलिसात तक्रार केली नसल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. येत्या दोन दिवसात टॉवर सुरु न केल्यास अधिकाऱ्यांच्या विरोधात उपसरपंच प्रवीण देसाई यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी उपसरपंच प्रवीण देसाई, ग्रामस्थ सचिन सावंत, विवेक केसरकर, विलास केसरकर, दत्तप्रसाद स्वार, मंगलदास देसाई, गौरांग केसरकर, पवन केसरकर, अभि वारंग, विजय देसाई यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page